खामगांव : कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांना बाधा होत आहेत.अशातच खामगांवचे भाजपचे आमदार अँड.आकाश फुंडकर कोरोना बाधीत असल्याची माहिती स्वतः त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.जिल्ह्यात दररोज अनेक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असूनही कुठल्याही प्रकारची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. खामगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड.आकाश फुंडकर यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांनी स्वतः खामगांव सामान्य रुग्णालयात जाऊन चाचणी करुन घेण्यासाठी गेले होते. काल दिनांक १० ऑक्टोबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असल्याची माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे. सोबतच त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतः ला सेल्फ कॉरंटाइन केले आहे.सोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक केतन पेसोडे हे सुद्धा कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत.आ. आकाश फुंडकर यांनी ट्विटर द्वारे आवाहन सुद्धा केले आहे की, माझा संपर्कात असलेल्या सर्वानी कोरोना चाचणी करुन घ्यावी.या कोरोनाच्या आजाराची लागण सामान्य ते राजकीय व्यक्तींना होतांना दिसत आहेत,मात्र गोर-गरीब,रस्त्यांवर फिरणाऱ्या तसेच फुटपाथवर बसणाऱ्या व्यक्तींना या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
previous post