April 19, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा

खामगांवकरांसाठी वरदान ठरणार कोव्हीड १९ टेस्टींग लॅब – आ.ॲड.आकाश फुंडकर

खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आ.आकाश फुंडकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी विकास निधी मधून खामगाव सामान्य रुग्णालयासाठी २० लक्ष रुपये निधी टेस्टिंग मशीनसाठी दिला होता परंतु जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे मशीन मिळण्यास अक्षम्य दिरंगाई झाली. त्यानंतरच्या पाठपुराव्यामुळे आताही टेस्टिंग मशीन खामगाव शहरात दाखल झाली असून सदर टेस्टिंग मशीनचे आज माजी मंत्री आ.डॉ संजय कुटे, माजी मंत्री प्रा.अशोक उईके, खामगावकरांसाठी व जिल्ह्याचे भूषण असलेले उद्योगपती बीपीन गांधी,आ..आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
खामगांव सह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे ओळखून खामगांव विधानसभा मतदार संघाचे आ.ॲड आकाश फुंडकर यांनी दि.६ जून २०२० रोजी सामान्य रुग्णालय खामगांव साठी रु २० लक्ष एवढा निधी स्थानिक विकास निधीतून वर्ग केला, त्यास १८ जून रोजी प्रशासकीय मान्यता देखील प्रदान करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे सदरची स्वॅब टेस्टींग मशीन मिळण्यास अक्षम्य दिरंगाई होत होती. हे ओळखून आमदार आकाश फुंडकर यांनी खामगांवकरांना लोकसहभागातून हे स्वॅब टेस्टींग लॅब विकत घेण्याबाबत आवाहन केली. आ.आकाश फुंडकरांच्या आवाहनाला खामगांव येथील उद्योजक बिपीन गांधी यांनी प्रतिसाद देत ही जबाबदारी स्वत: उचलण्याचे ठरविले व त्यांनी उपरोक्त मशीन व लॅब बनविण्यासाठी आवश्यक सर्व खर्च उचलला व त्यांच्यामुळे खामगांवात ही लोकसहभागातील पहिला कोरोना लॅब सुरु झाली व खामगांवकरांना दिलासा मिळाला. मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना खामगांवात रुग्ण स्वॅब तपासणी होत असल्यामुळे तात्काळ रुग्णांचे विलगीकरणाचे काम करणे शक्य होणार आहे.त्यात आ.आकाश फुंडकर यांच्या निधीतून आणखी दुसरी स्वॅब तपासणी मशीन उपलब्ध झाल्यामुळे खामगांव व जिल्हयासाठी मोठी उपलब्धी झाली असून बुलढाणा जिल्हयातील रुग्ण तपासणी लवकर होऊन त्यांचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
हया कोरोना स्वॅब टेस्टींग लॅबचे आज लोकार्पण करण्यात आले, त्या लॅबमुळे आता जवळपास १०० ते १४० स्वॅब नमुने तपासले जाणार असून त्यामुळे तात्काळ ‍रिपोर्ट मिळवून रुग्णांना होणारा मानसिक त्रास कमी होणार आहे व रुग्णांचे विलगीकरण तात्काळ करणे शक्य होणार आहे. आ.आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून बुलढाणा ‍जिल्हयाचा विचार करणारे नेतृत्व मिळाले असून आपल्या दूरदृष्टीतून त्यांनी जिल्हयाचा मोठा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यातून जिल्हयाला कायमस्वरुमी अत्याधुनिक लॅब उपलब्ध झाली आहे.आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात खामगांवच्या रुपाने पहिली स्वॅब टेस्टींग लॅब उभी झाली आहे.
आ.अॅड आकाश फुंडकर यांच्या निधीतुन बहुप्रतीक्षित कोरोना टेस्टिंग मशीनचे आज 2 ऑगस्ट रोजी खामगांव सामान्य रुग्णालयात माजी मंत्री आ. डॉ संजय कुटे, माजी मंत्री आ. अशोक उइके, आ. आकाशदादा फुंडकर सागरदादा फुंडकर, नगराध्यक्षा अनीताताई डवरे, उद्योगपती बिपीन गांधी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे, शेखर पुरोहित, राम मिश्रा, संजय शिनगारे यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले आहे. त्यामुळे लोकहितासाठी प्रशासनासोबत सुरु असलेल्या लढयात आ. फुंडकर यशस्वी झाले हे पुन्हा सिध्द झाले.

Related posts

इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू ; एक जण जखमी

nirbhid swarajya

आध्यातमाला पर्यावरण व संस्कारची जोड…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 434 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 103 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!