October 6, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शेगांव सामाजिक

खामंगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

खामगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळ्याचे आयोजन खामंगाव येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवार सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा खामंगाव शहरातील म्युनिसिपल हायस्कूल. रेल्वे स्टेशन च्या मागील बाजूला हनुमान मंदिर खामंगाव शहर येथे करण्यात आले आहे अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब,पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल साहेब ,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब, जिल्हा निरीक्षक गणेश देशमुख, जिल्हाध्यक्ष गणपत राठोड.जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय,राज्यातील पाच हायवे वरती २४ तास विनामूल्य ५२ रुग्णवाहिका अपघात ग्रस्त रुग्णांच्या सेवेत अविरतपणे चालू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील करंजी चौक येथे एक रुग्णवाहिका सेवेत कार्यरत आहे.महापुर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वरूप संप्रदाय समाजाच्या हितासाठी व मदतीसाठी सतत अग्रेसर असतो.यानिमित्ताने शहरातून जगद्गुरुश्रीच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे सभा मंडपामध्ये आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत .त्यामध्ये गुरुपूजन, उपासक दीक्षा ,आरती सोहळा , जगद्गुरुश्रींचे पादुका आगमन,अमृततुल्य असे प्रवचन , दर्शन सोहळा ,पुष्पवृष्टी तसेच मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत समाजातील गरजवंतांना ११ शिलाई मशीनचे मोफत वाटप आदी भरगच्च कार्यक्रम दिवसभरामध्ये संपन्न होणार आहेत.यावेळी उपासक दीक्षा चा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त भक्तगण यांनी बुकिंग करावी.उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिष्य, साधक, उपासक,भक्तगण , हितचिंतक,कार्यकर्ते यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीठ प्रमुख,पीठ सहप्रमुख,पिठ व्यवस्थापक ,जिल्हा निरीक्षक, पीठ समिती सदस्य ,जिल्हाध्यक्ष,हिंदू संग्राम सेना, महीला सेना, युवा सेना,ज.न.म.प्रवचनकार,गुरुसेवक, सर्व आजी व माजी पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष,जिल्हा समिती, तालुका समिती, सेवा केंद्र समिती,आरती केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

राज्यसरकारच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी अनुदानित बियाण्यापासून वंचित राहणार – आ.ॲड आकाश फुंडकर

nirbhid swarajya

शॉर्ट सर्किटमुळे दोन वाहने जळून खाक

nirbhid swarajya

खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचासह सदस्य निवडणूक

nirbhid swarajya
error: Content is protected !!