चिखली : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे या महामारिच्या काळात खाजगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आपली रुग्नसेवा जीव धोक्यात घालून देत आहेत. पहिला टप्प्यातिल कोरोना संक्रमण कमी करण्याचे मोठ कार्य या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले, मात्र अलिकडच्या काळात चिखली येथील १० खाजगी कोविड रुग्णालयात रुग्नसेवा देणार १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अचानक पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले आहेत. रुग्णसेवा देताना सततचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ताण वाढत होता, त्यांमुळे आम्ही राजीनामे देत आहोत असे कारण दिलेल्या राजिनाना पत्रात दिले आहे. त्यांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्या अगोदरच कोरोना हॉटस्पॉट म्हणुन ओळखला जात आहे, दररोज हजार च्या वर कोरोना बाधित रुग्न आढळून येत आहेत. शासकीय रुग्णालयात कुठेही बेड उपलब्ध नाही, अश्या परिस्थितीत काही रुग्ण खाजगी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र खाजगी रुग्णालयात कोणताही राजकीय पुढारी, नेता येऊन धमक्या देत आहेत, सतत राजकीय हस्तक्षेप वाढला होता. तसेच ऑक्सीजन तुतवडा व रेमडीसीवीर इंजेक्शन तुतवडा यामुळे खाजगी रुग्णालये चालविने कठिन झाले असून मानसिक त्रास वाढला आहे. त्यामुळे सामुहिक राजिनामें देण्याचे ठरवून चिखली येथील सर्व खाजगी रुग्णालयातील १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यकडे सामहिक राजीनामा पत्र दिले आहे. आता पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या राजीनामा पत्रावर क़ाय भूमिका घेतात याकडे जिल्ह्या वासियाचे लक्ष लागले आहे.
previous post
next post