बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कोविड रुग्णालयासह खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांनी भरलेले असून बेड मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस खासगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे.त्यामुळे खाजगी कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांनी खाजगी कोविड रुग्णालयाकडून देण्यात आलेले देयके आधी स्थानिक तहसीलदारांकडून त्याची तपासणी करून घ्यावी व नंतरच तहसीलदाराच्या म्हणण्यानुसार देयके अदा करावे असे आवाहन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णांना केले आले आहे. कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत राज्याचे अन्न व औषधी प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन मंगळवारी 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.याप्रसंगी बैठकीत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,आदी उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यात एकूण 23 खाजगी कोविड सेंटर कार्यरत असून या रुग्णालयांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व कोरोना संशयित रुग्ण उपचार करून घेत आहेत. 10 ते 15 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांकडून लाखो रुपयांचे देयके वसूल करण्यात येत असल्याच्या तोंडी तक्रारी वाढल्या असून या खाजगी कोविड रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार घेणे अडचणीची जात असल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताच पालकमंत्री डॉ शिगणेंनी आपल्या उत्तरात सांगितले की, यापूर्वीच शासनाने खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून देयके वसूल करण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केले असून त्या अध्यादेशात ठरवून दिलेल्यानुसार खाजगी रुग्णालयांनी देयके घेणे बंधनकारक आहे.त्यामुळे खाजगी कोविड रुग्णालयाकडून देण्यात येणारे देयके प्रथम स्थानिक तहसीलदार यांच्याजवळ नियमाप्रमाणे दिले गेले आहे किंवा नाही याची तपासणी करून घ्यावी व नंतर तहसीलदारांच्या सगीतल्यानंतरच खाजगी कोविड रुग्णालयांना देयके अदा करावे, असे सूचना आम्ही अगोदरच दिलेले आहे.आणि जर सूचनांचे अंमलबजावणी होत नसेल तर ताबडतोबीने संबंधीत तहसलीदारांना तशा सूचना देण्यात येतील.आणि रुग्णांनी सुद्धा तहसीलदारांना देयके दाखविल्या शिवाय देयके अदा करू नये असे आवाहन डॉ.शिगणेंनी जनतेला केले.