जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी आंदोलनाचा दिला इशारा…
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेवर परवानगी देण्याची मागणी…
खामगांव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील तीन टक्क्यांपेक्षाही कमी आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निकषानुसार बुलडाणा जिल्हा अनलॉक च्या पहिल्या लेव्हल मध्ये आला असून सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने व इतर सेवा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केला आहे. यामध्ये शॉपिंग मॉल , सिनेमागृहे , थिएटर यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे, मात्र सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे , खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय हे सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता ५० टक्के क्षमते सह खाजगी कोचिंग क्लासेसना सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलडाणा कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी केली आहे. तर शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.