गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा अन्यथा आंदोलन तिव्र करण्यात येईल – आ.फुंडकर
खामगांव : काल घडलेली घटना ही अतिशय निंदनीय असून बहुधा महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल की राज्याच्या गृहमंत्री यांनी महिन्याला १०० कोटी वसुली करण्याबाबत आदेश दिले असे पोलीस महासंचालकांनी आरोप केला. ही घटना निंदनीय असून गृहमंत्री यांनी या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी तात्काळ राजीनामा द्या अशी मागणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपर्ण राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणी साठी आंदोलन करण्यात येत आहे. बुलढाणा भाजपाच्या वतीने देखील ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संपुर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. या राज्यात केवळ गुंडच हे गुंडगिरी करुन जनतेला छळत नसून या राज्याचे मंत्रीच गुंडांचे काम करीत असून हप्ता वसूलीची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांना देत असून त्यातून उघड गुंडगिरीला समर्थन देण्याचे काम होत आहे. यावेळी अनेक प्रश्न निर्माण होत असून बार व हॉटेल मालकांकडून प्रत्येकी ३ लाख वसुल करण्यात यावे असे आदेश राज्याच्या गृहमंत्री यांनी द्यावे हे धक्कादाय व निंदनिय आहे. कदाचित याच साठी कोरोनाच्या नावावर रात्रीची संचारबंदी तर लावली नसावी असा संशय निर्माण होत आहे. हप्ते द्या अन्यथा रात्रीची हॉटेत्स बंद. अशी ही एक शंका निर्माण होत आहे. तसेच मुंबईतील नाईट लाईफला असलेला पाठींबा हा देखील या साठीच असावा असे वाटते. राज्यातील जनता अतिवृष्टी गारपिट, ओला दुष्काळ, कर्जमाफी, वीज बिल माफी यासाठी सरकारकडे आशेने पाहत असतांना सरकारमधले अत्यंत महत्वाचे समजल्या जाणारे राज्याचे गृहमंत्री हे महिन्याला १०० कोटी हप्ता वसुली आणण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनाच आदेश देत आहेत हे अत्यंत निराशा जनक आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यभरात अधिक तीव्र आंदोलन करुन रस्त्यावर उतरेल असेही आमदार ॲड आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा म्हणाले. खामगांव भाजपाच्या वतीने टॉवर चौक खामगांव येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. यावेळी भाजपा सोशल मिडीया सेल चे श्री सागर फुंडकर, शरदचंद्र गायकी,अनिता देशपांडे, गजाननराव देशमुख, संजय शिनगारे, चंद्रशेखर पुरोहित, रेखा जाधव महिला आघाडी अध्यक्षा, राजेंद्र धनोकार, विलासराव देशमुख, राकेश राणा,डॉ एकनाथ पाटील, महेंद्र रोहणकार, वैभव डवरे, जितेंद्र पुरोहित, शेखर कुळकर्णी, राम मिश्रा, पवन गरड, नगेंद्र रोहणकार,संजय भागदेवानी, गणेश जाधव, संजय मोहिते, गोलू आमले, गोलू आळशी,सचीन पाठक, विक्की हटटेल, गणेश कामूकर,दत्ता जवळकार, संतोश येवले, बळीराम लाहूडकार, अजय खोद्रे, पवन तनपूरे, श्रीकांत जोशी, हितेश पदमगीरवार, अमोल राठोड, रवि गायगोळ, संजु गुप्ता, अमोल खिरडकर, बंटी चौकसे, कुलक तायडे, मोहित ठाकुर, अजय ठाकूर, प्रितम चव्हाण, निकुंज मंधानी, योगेश कोल्हे, विक्की चौधरी, अभीपिंपळकर, रोशन गायकवाड, संदीप राजपूत, पवन राठोड, रोहन जैस्वाल, विक्की रेठेकर, शुभम देशमुख, शशांक वक्टे, रमेश इंगळे, निखील नथ्थानी, मुन्ना पेसोडे, कल्पेश बजाज, सुरज लोंढे, चंदु भाटीया, आकाश बडासे, संजय डांगे, पवन डीक्कर, प्रतिक मुंडे,रवि चौखट, मयुर घाडगे, नितीन पोकळे, गजानन मुळीक, रुपेश शर्मा, विकास चवरे, आदित्य केडीया, भावेंद्र दुबे, सोनु नेभवाणी, अमीत बेरोज्या, शुभम ठाकुर, योगेश पिंगळे, गोपाल मानकर,संदीप देशमुख, दिपाशु भैय्या, परीतोष डवरे, मामा कांडेकर, गजानन वाघमारे, दर्पण शर्मा, रोहन मार्वे, आकाश मिश्रा, हिटल गोयल, राज टिकार पाटील, संदिप त्रिवेदी, सुधाकर काळे, आकश पांडे, आशीष सुरेका, विक्की भदोरिया यांचेसह भाजपा, भाजपायुवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.