खामगाव : धनज येथे गॅस सिलेंडर खाली करून मुंबईला परत जात असताना ट्रक चालक अर्जुन किसन चव्हाण हे पारखेड फाट्याजवळील बाबा रामदेव ढाब्यावर काल ७ ऑगस्ट रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी थांबले होते. जेवण आटोपून ट्रक क्र.एमएच०४-जेयु-२७३९ कडे जात असताना सागर भागवत देलोकार रा.पारखेड व अजय मोहन तायडे रा जयुपर लांडे या दोघांनी दारुच्या नशेत ट्रक च्या कॅबिन मद्धे जाऊन काचा लाथा बुक्यानी फोड़ल्या व ट्रक् चालक अर्जुन चव्हाण याला अश्लील शिविगाळ केली व लॉकडाऊन असताना तू ट्रक कसा काय घेऊन चालला असे म्हणून खाली उतरवून बाजूला पडलेली काठी अजय तायड़े याने हातात घेऊन अर्जुन चव्हाण याच्या डोक्यावर हातावर मारली व सागर बेलोकार याने लाथा बुक्यानी पाठीवर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच ट्रक्ट चे 15 हजाराचे नुकसान केले. या प्रकरणी ट्रक्ट चालक अर्जुन चव्हाण यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन दिलेल्या फिर्यादि वरुन उपरोक्त दोघांविरुद्ध कलम २९४,३२४,४२७,५०४,३४ भादवी कलम ६५ ई मदाका नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोहेका मनोहर कोल्हे करीत आहे
next post