३ दिवसातून फक्त ३ वेळा दिले जेवण
खामगाव : कोरोना विषाणुच्या संसर्गाला रोखण्यासाठी सरकारने देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन केले आहे.त्यामुळे सर्व उद्योग आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर राज्यातील कामगार वर्गही मोठा प्रभावित झाला असून काम नसल्याने सर्व आपल्या राज्यात स्थलांतर करीत आहेत.मात्र स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले गुुुजरात आणि राजस्थान,झारखंड येथील 108 जणांना खामगाव पोलिसांनी डिटेन करून त्यांना 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात आले होते.मात्र क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर उपासमारीची पाळी आल्याचे विदारक चित्र खामगाव येथे समोर आले आहे .तर प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप ही हे मजूर करत आहेत .
कोविड- 19 च्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मजुर आणि कामगार वर्ग स्थलांतरण करीत असल्याने प्रशासनासमोर या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे केंद्र शासनाने ज्या ठिकाणी मजूर स्थलांतरीत करतांना मिळून येईल त्यांना तेथेच डिटेन करून १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्याचे आदेश दिल्यावरून खामगावात मोहीम राबवून एकूण 108 परप्रांतीयांना खामगाव शहराबाहेरील पिंपळगाव राजा रोडवरील मागासवर्गीय वसतिगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आलेय.आपल्याला जीवनावश्यक सुविधा दिल्या जाईल असे आश्वासन दिल्या नंतर हे परप्रातीय तेथे राहायला तयार झाले , मात्र प्रशासनाने दिलेल्या शब्दाला न जागता त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने मागील ३ दिवसांपासून या 108 जणांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.आज दुपारी ३ वाजता प्रशासनाने यांना खिचडी पाठविली होती. मात्र ती खूपच कमी असल्याने अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक उपाशी आहेत. तर ३ दिवसांपासून त्यांना फक्त ३ वेळा जेवण देण्यात आलंय. शौचालय ची व्यवस्था नाही. या शिवाय मासिक पाळी आलेल्या महिलांनकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून महिला संतप्त झालेल्या असून सुविधा पुरवा आणि पोटभर जेवण द्या , अन्यथा आम्हाला जाऊ द्या, अशी विंनती येथील नागरिक करीत आहे. सोबत लहान लहान मुले सुद्धा असून त्याना अर्ध्या उपाशी पोटी राहावे लागते .
मात्र यावर प्रशासन काहीच बोलायला तयार नाही आहे. आम्ही उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तसेच तहसीलदार डॉ शितलकुमार रसाळ यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे