बुलडाणा : बुलडाणा येथील १०० खाटांचे स्त्री रुग्णालय हे क्वारंटाईन रुग्णासाठी राखीव करण्यात आले आहे, याठिकाणी संशयित रुगणांना १४ दिवस ठेवल्या जात आहे मात्र तेथे ठेवण्यात आलेल्या पेशंट ची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे माहिती खुद क्वारंटाईन असलेले मलकापूर येथील नगराध्यक्ष हरीश रावळ यानी दिली आहे. तेथील परिस्थितीचा तसा व्हिडीओ त्यांनी काढून व्हायरल केला आहे.
दोन दिवसापासुन शौचालयात पाणी नाही, बेड वरील चादर कित्येक दिवसापासुन बदलेले नाहीत, स्वच्छता अजिबात नसल्याने रुग्ण बरे होण्याऐवजी रुग्ण आणखी सिरिअस होऊ शकतो अशी भीती त्यानी व्यक्त केली. तसेच कुठलीही सुविधा नसल्याने येथील ७ पेशंट पळून गेल्याची धक्कादायक माहिती सुद्धा नगराध्यक्ष हरीश रावळ यानी दिली आहे.