खामगांव : क्रेशर मशीन मध्ये दगड फोड़ण्यासाठी वापरली जाणारी ४० किलो वजनाची लोखंडी टॉगल प्लेट चोरुन नेल्याची घटना वरखेड खुर्द शिवारात घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार वरखेड़ खुर्द शिवारात तलाव रोडवर प्रसाद दिलीप भट्टड बालाजी स्टोन क्रेशर येथून त्यांच्या क्रेशर मशीन मध्ये दगड फोड़ण्यासाठी वापरली जाणारी ४० किलो वजनाची लोखंडी टॉगल प्लेट किं १५ हजार रु १८ जुन रोजी रात्रि दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.
याप्रकरणी प्रसाद भट्टड यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका काशिराम जाधव करीत आहेत.