खामगाव : बांधकाम व्यवसायाशी निगडित क्रेडाई संघटना ही राष्ट्र पातळीवरील मोठी संघटना असून बांधकाम व्यवसायिकांच्या पाठीशी सदैव उभी राहील अशी ग्वाही संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी दिली.खामगाव येथे आज 20 ऑगस्ट रोजी अकोला रोड वरील हॉटेल हायवे ग्लोरी येथे खामगाव शाखेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते मंचावर न प मुख्याधिकारी सौ जयश्री काटकर-बोराडे संघटनेचे राज्य सहसचिव दिनेश ढगे, राज्य सदस्य राजेंद्र भामरे,खामगाव शाखाध्यक्ष देवेश भगत व डॉ किशोर केला यांची उपस्थिती होती.प्रमोद खैरनार पुढे म्हणाले की, बांधकाम व्यवसायाची व्याप्ती फार मोठी असून हा व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर रित्या करावा लागतो.ग्राहकांना गुणवत्ता पूर्वक घर योग्य किमतीत व वेळेत देऊन त्यांचे घराचे स्वप्न साकार करण्याचा मुख्य उद्देश संघटनेचा आहे.त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी महारेरा कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे जेणेकरून व्यवसायिक व ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही.बांधकामासंदर्भात मनपा व न.प. क्षेत्रात वेगवेगळे नियम असले तरी या नियमाला अनुसरूनच व्यावसायिकांनी काम करावे व कोणतेही अनाधिकृत काम करू नये असा मोलाचा सल्ला दिला. देशात महाराष्ट्र राज्य सर्व दृष्टिकोनातून प्रगत असून येथे प्रत्येक क्षेत्रात व्यवसायाची मुक्त संधी उपलब्ध आहे.आज राज्यात शहरी व ग्रामीण भागात 50 टक्के लोक वस्ती असल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळत आहे. व्यवसाय करतांना व्यावसायिकांनी केवळ लाभाचा विचार न करता वॉटर हार्वेस्टिंग स्क्रीन झोन यासारख्या विकासात्मक उपक्रम राबऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी जेणेकरून खामगाव शहर कॉटन सिटी,सिल्वर सिटी ओळखले जाते व आता बिल्डर सिटी म्हणून नावारूपास येईल असे सांगून बांधकाम व्यवसाय संदर्भात माहिती दिली.प्रमुख अतिथी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र भामरे, यांनी आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यातही संघटनेचे गठन करण्यात येईल तसेच बांधकाम व्यवसायात येणाऱ्या अडी अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मदत करण्यात येईल क्रेडाईच्या सदस्यांनी चांगले काम करून नावलौकिक प्राप्त करावा असे आवाहन केले तर दिनेश ढगे यांनी सरकारकडून नवीन कायदे बनविले जातात या कायद्यांची पालन करावे की पळवटा शोधाव्या हाच पर्याय नागरिकांसमोर उरतो परंतु सरकार जरी कायदे बनवत असले तरी संघटनेच्या माध्यमातून बदलता येतात यामुळे संघटनेशी जुळणे आवश्यक असल्याचे सांगितले कारण आज पर्यंत क्रेडाई संघटनेच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात अडसर ठरणारे वीस ते पंचवीस कायदे बदलण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.न प मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी सांगितले. की शासनाच्या नियमानुसार प्रशासनाला काम करावे लागते परंतु बदलत्या नियमामुळे विकासाला चालना मिळते सर्वसामान्य नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांचा आधार घ्यावा लागतो यामध्ये प्रशासन व व्यावसायिकांमधील समन्वयाने अडचणी असे सांगून बिल्डर बांधवांनी शहराचा विकास साधावा असे आवाहन केले सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलांकरुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले प्रास्ताविक भाषणातून देवेश भगत यांनी क्रेडाई संघटनेबाबत माहिती देऊन संघटनेच्या माध्यमातून रियल इस्टेट उद्योगाला चालना मिळून विकास साधने शक्य होईल तसेच सरकारी धोरण व कायद्याच्या चौकटीत राहून ग्राहकांना संघटनेच्या माध्यमातून चांगली सेवा देण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले तसेच खामगाव शाखा कार्यकारणी जाहीर केली यामध्ये उपाध्यक्ष नंदकिशोर दुबे, सचिन टीडोळे,सचिव मनोज मोदी,सहसचिव चंद्रकांत खेमोत,कोषाध्यक्ष प्रफुल अग्रवाल,सदस्य दिनेश अग्रवाल,प्रसाद कापरे,निलेश इंगळे,पंकज घुले,अमित शर्मा,समीर दलाल, पंकज अग्रवाल,निलेश भोयर, प्रमोद अग्रवाल, अनिल चावंडे,संदीप बोदळे,शोभानंद जयस्वाल,दिपेन सरोदे,सदानंद कुलकर्णी,शशांक देशपांडे,तसेच जळगाव जामोद शाखेचे डॉ किशोर केला,प्रमोद भन्साली, शैलेश मोदी व संजय पलन यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन संकेत सुराणा तर आभार प्रदर्शन मनोज मोदी यांनी केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाचे सांगता झाले.
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ विविध लेख व्यापारी सामाजिक