November 20, 2025
क्रीडा जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शिक्षण शेगांव

क्रिकेट अकॅडमीचे विद्यार्थी जळगावात चमकले

अंडर१९ क्रिकेट मधे शेगावाच्या मानात आनखी एक भर

शेगाव : अंडर १९ नॅशनल क्रिकेट चैंपियन ट्रॉफी जळगाव खान्देश येथे ६ फेब्रूवारी रोजी संपन्न झालेल्या नॅशनल चैंपियनशीप मधे शेगाव गायत्री क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या टीम वर विजय मिळवून घवघवीत यश प्राप्त करून शेगाव शहराच्या मानात भर टाकली आहे. दरवर्षी नॅशनल क्रिकेट असोशियशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यामधे महाराष्ट्रातील अंडर१९ चे स्पर्धक सहभागी होतात सेमी फाइनल व फाइनल मधे शेवटच्या क्षणा पर्यत लढवय्या असणाऱ्या शेगावच्या गायत्री क्रिकेट अकॅडमीचे शुभम तिवारी, उज्वल रॉय, पीयूष इंगळे, देवेश मुंडाले,ओम देशमुख, विजय गव्हाळे यांनी अखेर पर्यंत टूर्नामेंट मधे ट्वीस्ट आनत भुसावळ राइडर्स या स्पर्धक टीमला २३० चे टारगेट देऊन त्यांना १६० धावात ऑलआउट करून विजय प्राप्त करून बुलडाणा जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. या क्रिकेट चैंपियनशीप मधे शेगाव गायत्री क्रिकेट अकॅडमीच्या वतीने शुभम तिवारी,उज्वल रॉय यांनी सर्वाधिक रण बनविन्याचा बहुमान मिळाला असून गोलंदाजीत देवेश मुंडाले ओम देशमुख यांनी प्रत्तेकि ४ विकेट पटकावून विजयश्री खेचुन आणली आहे. सदर युवकांनी केलेल्या कामगिरी बद्दल आपल्या यशाचे श्रेय शेगाव गायत्री क्रिकेट अकॅडमीचे कोच तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यश परियाल यांना दिले आहे.

Related posts

जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान…

nirbhid swarajya

बुलढाणा अर्बन च्या वतीने वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

nirbhid swarajya

शासकीय आधारभुत किंमत योजनेंतर्गत आ.आकाश फुंडकर यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

nirbhid swarajya
error: Content is protected !!