खामगांव : भारिपचे प्रदेशाध्यक्ष तथा वंचितने पार्लमैट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी येथील सामान्य रुग्णालयाच्या covid-19 वार्ड मधील कोरोनाग्रस्त रुग्णाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर करून परवानगी मागितली आहे. रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा आहे. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेकडे कमी मनुष्यबळ असतांनाही उत्तमपणे कोरोनाविरुध्द लढा देत आहेत. अशावेळी आपल्यालाही समाजाप्रती काही देणे लागते त्या अनुषंगाने भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी येथील सामान्य रूग्णालयातील कोव्हीड-१९ वार्डातील रूग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत आज त्यांनी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर करून परवानगी मागीतली आहे. निवेदन देतांना भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्यासह पदाधिकारी तसेच महिला आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित होते.