April 19, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

कोविड रूग्णालयाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी


लोकार्पण कार्यक्रम तयारीचा घेतला आढावा

बुलडाणा : स्थानिक 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयाचे डेडीकेटेड कोविड रूग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. या रूग्णालयाचे अद्ययावतीकरणाचे काम टाटा ट्रस्टकडून करण्यात येत आहे. रूग्णालयाचे अद्ययावतीकरण अंतिम टप्प्यात असून या कामाची पाहणी आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी त्यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, निर्माण केलेल्या पायाभूत सोयी सुविधा, आयसीयु आदींची पाहणी केली. तसेच रूग्णालयाचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी होणाऱ्या ई लोकार्पण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ प्रेमचंद पंडीत, सार्व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, मुख्याधिकारी श्री. वाघमोडे आदींसह डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे आज दे. राजा येथील कोविड केअर हॉस्पीटलची पाहणीही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केली. या रूग्णालयाचे ई लोकार्पणही करण्यात येणार आहे. या रूग्णालयाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा व सुविधांचा आढवाही पालकमंत्री यांनी घेतला. याप्रसंगी संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

१०वी, १२वी परीक्षांच्या तारखा बदलल्या…

nirbhid swarajya

मुलगी वाचली पण आई गेली…

nirbhid swarajya

हिंदुस्तान लिवर कामगार संघटनेची निवडणुक पडली पार

nirbhid swarajya
error: Content is protected !!