खामगाव :- दरवर्षीप्रमाणे उर्मिला ठाकरे पुरस्कृत शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, राष्ट्रीय, शेत्रातील प्रशंसनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना उर्मी गौरव पुरस्कार दिला जातो परंतु कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड योद्धे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे त्यामुळे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात कोरोनाला हाकलून लावण्यासाठी अधिक उर्मी व ऊर्जा मिळावी मनोबल वाढावे म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे योद्धे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस बी वानखडे ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांना सामाजिक कार्यकर्त्या वनश्री उर्मिला ताई ठाकरे यांनी शैक्षणिक मूल्य ,शिक्षण ग्रंथ ,शैक्षणिक पुस्तक संच, प्रबोधनात्मक यशोगाथा ,उर्मी बाल काव्यसंग्रह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी डॉ. गुलाब पवार, डॉ. सोनवणे, डॉ. जाधव ,डॉ विनोद पवार, डॉ जाधव, डॉ. प्रशांत वानखडे , मेट्रेन सुमित्रा राऊत, ब्लड बँक टेक्निशियन सौ. राजश्री पाटील, पुरुषोत्तम हिंगणकर, सौ सरोज देशमुख, कोषागार गणेश देशमुख ,स्टाफ नर्स अर्चना चव्हाण, सपना सोनवणे, अश्विनी शेळके, सुजाता पहुरकर, शुभांगी पाटील, परिचारिका ब्रदर्स , कामगार यांच्यासह स्टाफ नर्स ब्रदर्स, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, अशा 15 कोविड योद्ध्यांना उर्मी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आर्मी ग्रुपच्या वतीने डॉ. नर्स आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीइ चे वाटप स्थानिक आर्मी ग्रुपच्यावतीने सामान्य रुग्णालयातील कोविड योद्धा वैद्यकीय अधीक्षक डॉ .वानखेडे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे , मेट्रेन सुमित्रा राऊत, टेक्निशियन राजश्रीताई पाटील, सौ सरोज देशमुख यांच्यासह डॉक्टर, स्टाफ, नर्स, आरोग्य कर्मचारी, यांना १५ पीपीई चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी सौ भारती कांडेकर, शर्मिलाताई ठाकरे,अनिता देशपांडे, कविता शर्मा, पुनम कापडे व संपूर्ण आंर्मी ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले
previous post