January 4, 2025
आरोग्य बुलडाणा

कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या शहरात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

चिखली : देशभर हैदोस घालणाऱ्या कोरोनाने बुलडाणा जिल्ह्यात देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ६ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. बुलडाणा आणि चिखली शहरात तर रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्याच अनुषंगाने आज चिखली येथे अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना अनेक महत्वपूर्ण सूचना देखील केल्या.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले असून यामध्ये चिखलीतील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे चिखली शहराकडे कोरोना हॉटस्पॉट म्हणून बघितल्या जात आहे. याचीच दखल घेत चिखलीतील महसूल, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, नगर परिषद व पोलीस प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायकाय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे जे ग्राऊंडलेवलला काम करत आहे अशा आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांचे सुरक्षिततेबाबत नेमकी काय काळजी घेण्यात येते, याबाबतची त्यांनी विचारणा केली. काम करत असतांना अधिकाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी त्या देखील मनमोकळेपणाने सांगाव्या अशा देखील सूचना त्यांना केल्या. संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणारा लहान असो की मोठा त्यावर कडक कारवाही करावी असे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहे. चिखली शहरातील परिस्थिती हाताळत असतांना येथील निर्णय घेण्याचे अधिकार नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले. ग्रामीण भागात नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे काम करतांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Related posts

जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरु

nirbhid swarajya

ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंचांचीच नेमणुक करावी – सरपंच संघटनेची मागणी

nirbhid swarajya

भाजपच्या वतीने भारतरत्न अटलजींना अभिवादन करून सुशासनदिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!