April 19, 2025
बुलडाणा

कोरोना संसर्गाचा फटका टी-१ सी-१ या वाघालाही

बुलडाणा : कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे  संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असतांना बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील टी-१ सी-१ या वाघाला सुध्दा कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. हा वाघ वयात आलेला असल्यामुळे या वाघासाठी वाघिणीचा सुरू असलेला शोधही त्यामुळे लांबणीवर पडला आहे.

टिपेश्‍वर अभयारण्यातील टी वन या वाघिणीचा हा बछडा आहे. त्याचा जन्म २०१६ मध्ये झालेला आहे. २०१९ मध्ये या वाघिणीपासून हा बछडा विभक्त झाला होता. टिपेश्‍वर अभयारण्यातून या वाघाने १३०० किलोमीटरचा संचार करून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत मजल मारली होती सोबतच नवा अधिवास शोधण्यासाठी या वाघाने पाच महिन्यांत हे अंतर पार करून नवा विक्रम सुध्दा केलेला आहे. या वाघाने ज्ञानगंगा अभयारण्य त्याचा अधिवास म्हणून निवडलेला आहे. त्याची रेडीओ कॉलर आयडी सुध्दा काढण्यात आली आहे. आता पूर्ण वाढ झालेला टी-१ सी-१ या वाघाला जोडीदार शोधण्यासोबतच ज्ञानगंगा अभयारण्य त्याच्या अधिवासासाठी उपयुक्त असल्याचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समितीही गठीत करण्यात आली होती व या समितीची ६ मार्च रोजी एक बैठक झाली होती. त्यात प्रत्यक्ष ज्ञानगंगा अभयारण्याची पाहणी व अधिवास क्षेत्र तपासण्यासाठी बिलाल हबीब व अन्य सदस्य २८ मार्च रोजी येणार होते. मात्र कोरोना संसर्गाच्या देशव्यापी संकटामुळे या समितीमधील सदस्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. परिणामी  टी-१ सी-१ साठी जोडिदाराचा शोध घेण्याची प्रक्रियाही यामुळे लांबणीवर पडली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 199 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 86 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

कोरोना परिस्थितीबाबत आ. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

nirbhid swarajya

खासदार राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!