शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
शेगांव : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शासनाने कोरोना वॅक्सिन लसीकरण सुरू केले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी प्रथम कोरोनाचे लसीकरण करून घेतले. यात एका कर्मचाऱ्याला २२ जानेवारी रोजी लस देण्यात आली. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोना तपासणीसाठी घशातील स्वबचे नमुने दिले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा १६ फेब्रुवारी रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शेगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची चाचणी करण्यापूर्वीच लस घेतल्यानंतर कर्मचारी-अधिकारी बेफिकीर होत वावरले. त्यानंतर आता लस घेतलेला कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून लसीकरण झालेलेसुद्धा पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत भर घालत आहेत. करोनाला प्रतिबंध करणारी लस घेतली म्हणजे तुम्हाला करोनाचा संसर्ग होणारच नाही, अशा भ्रमात राहणे चुकीचे ठरू शकते. शेगावच्या शासकीय रुग्णालयात एका आरोग्य कर्मचाऱ्याने लस घेऊनही आठ दहा दिवसांतच त्याचा करोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.सदर कर्मचाऱ्याने २२ जानेवारी रोजी त्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली होती. दुसरी लस घेण्यास ४ दिवसांचा अवकाश बाकी असतानाच हा कर्मचारी निकटवर्तीय कोविड बाधितांच्या संपर्कात आला. त्यामुळे त्यांनीदेखील करोना निदान तपासणी करवून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला लक्षणे व ताप येत असल्याने तो शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालय येथे उपचार घेत आहे असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.पी पी चव्हाण यांनी सांगितले.