खामगाव : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आकडा वाढताना दिसून येत आहे. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाची सुरुवात केली आहे. काही दिवसां पहिले ६० वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना ची लस देण्यात येत होते. मात्र १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील व्यक्ती ला सुद्धा या लसीकरणाचा लाभ देण्यात येत आहे. याकरिता खामगाव शहरातील घाटपुरी रोडवर असलेल्या आईसाहेब मंगल कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमानाने लसीकरण करण्याचे सुरू करण्यात आले आहे. लसीकरणामध्ये काल एका दिवसातच तब्बल २७६ लोकांनी लसीकरण केले असून लसून घेण्यासाठी सकाळपासूनच मंगल कार्यालय येथे नागरिक येणे सुरु आहे. या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळून, सोशल डिस्टंसिंग ठेवून, सॅनीटायगर चा वापर करून योग्य ती काळजी घेत लसीकरण करणे सुरू आहे.यावेळी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराअध्यक्ष तसेच नगरसेवक देवेंद्र देशमुख, अजय धनोकार, विजय कुकरेजा, दिलीप पाटील, आकाश खरपडे, प्रशांत धोटे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
previous post