खामगाव : कोविड 19 वर औषधि उपलब्ध नाही मात्र शरीराची प्रतिकार शक्ति मजबूत असावी जेणेकरून कोरोनावर काही प्रमाणात मात करता येईल त्यासाठी केंद्र सरकारने लेखी स्वरुपात निर्देशच जारी केले असून आर्सेनिक अल्बम 30 ही औषधि सेवन करावे असे स्पष्टपणे जाहिर केले आहे त्यानुसार आज खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा बुलढाणा चे वतीने रविकांत माहुलीकर यांचे सौजन्याने पोलिस बांधवांना आर्सेनिक अल्बम या उपयुक्त औषधी व मास्क चे वितरण करण्यात आले, प्रसंगी शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील हुड तसेच ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार रफीक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी शिवाजीराव पाटील, खामगाव मतदार संघाचे निरीक्षक विश्वनाथ झाडोकार, खामगाव मतदार संघाचे प्रमुख धोंडीराम खंडारे, खामगाव शहर अध्यक्ष देवेंद्र दादा देशमुख, राष्ट्रवादी युवती आघाडी च्या ड.मीरा बावस्कर, अँड. आरिफ शेख, मंगेश लाहुडकर, व अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.