खामगाव : सामान्य कोरोना योध्यानप्रति जनतेकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी कोरोना रुग्णासाठी उत्तम व्यवस्था करीत आहे. अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर या योध्यानप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ.अँड आकाश फुंडकर यांनी या योध्दांसाठी संरक्षण साहित्य दान करण्याचे आवाहन केलेले आहे. या आवाहनाला प्रतिसाद अनेकजण देत असून रुग्णकल्यानं समिती सदस्य संजय शिनगारे व राम मिश्रा यांचेकडे मास्क, सॅनिटायझर,पीपीइ किट मदत म्हणून देत आहेत. आजसुद्धा एका सामान्य व्यतीने नाव न घोषित करता राम मिश्रा यांचेकडे 500 N 95 मास्क व 40 पीपीइ किट व लागणारे इतर कोरोना संरक्षण साहित्य मदत म्हणून पाठवली. सदर मदत आज आ.अँड आकाश फुंडकर यांचे हस्ते सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, उद्योजक पप्पूसेठ अग्रवाल, न प आरोग्य सभापती राजेंद्र धानोकार,रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा आदींची उपस्थिती होती.
previous post