शेगाव : कोरोना काळात जीवाची बाजी लाऊन सतत देशाप्रती आत्मियता ठेवणार्या गोंधळी समाजातील कोरोना योद्धा म्हणून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार अशा विविध विभागात सेवा देणाऱ्या योद्ध्यांचा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद अकोला यांनी सत्कार व सन्मान पत्र देउन त्यांचा गौरव केला.यावेळी शेगाव येथे दै सकाळ वृत्तपत्राचे शेगाव प्रतिनिधी दिनेश महाजन यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद अकोला येथील संस्थापक अध्यक्ष पी.टी. धांडे यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थेचे राज्य कार्यकारिणी मार्गदर्शक तथा वाशिम जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांचे प्रमुख उपस्थितीत अकोला कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ अकोला जिल्हाउपाध्यक्ष संजय शिंगनाथ यांच्या वतीने कोरोना योद्ध्याचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. कोरोना काळात सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्नालयात सेवा देणाऱ्या सुनिताबाई महाजन, नांदेड मेडिकल कॉलेज येथे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ लक्ष्मी महाजन, औरंगाबाद कामगार रुग्नालयात कार्यरत अधिपरिचारिका सौ पल्लवी महाजन वराडे, अकोला प्रयोग शाळेत कार्यरत शुभम गीते, प्रतिक गीते, जिल्हा स्त्री रुग्नालय अकोला येथे सेवा देणारे विनोद गीते तसेच अकोला सिटी कोतवाली पोस्टेला कार्यरत असलेले पो कॉ मंगेश महाजन आदिंचा कोरोना योद्धा म्हणून परिषदेतर्फे गौरव करण्यात आला. त्यांना गौरविण्यात आले सदर्हु कर्मचारी व पत्रकार हे कोरोना काळात जीवाची बाजी लाऊन देशसेवा करीत असल्याचे मनोगत पत्रकार परिषदेचे संस्थापक धांडे तथा वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी त्याचे कौतुक केले आहे.
next post