शेळके आणि खराटे परिवाराचा निर्णय
खामगाव : येथून जवळच असलेल्या सुटाळा बु येथील शेळके परिवार व नांदुरा येथील खराटे परिवाराने आज ग्रामपंचायत मध्ये आपल्या मुलांचा विवाह नोंदणी पद्धतीने केला आहे त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने सोशल डिस्टनसिंग आणि गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
सुटाळा बु ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी या नोंदणी विवाहासाठी प्रयत्न केले आहेत , सुगदेव शेळके यांची कन्या प्रतीक्षा व नांदुरा येथील प्रमोद खराटे यांचे चिरंजीव वैभव यांचा ग्रामपंचायत मध्ये आज नोंदणी विवाह संपन्न झाला या वेळी सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आले आहे मुलाकडून फक्त ३ माणसं व मुलीकडून सुद्धा ३ व्यक्ती उपस्थित होते. नवरदेव व नवरी या दोघांनाही फेस मास्क लावूनच ग्रामपंचायत मध्ये हजर करण्यात आले. ग्रामपंचायत च्या वतीने मुलीला कन्यादान म्हणून एक हजाराचा चेक देण्यात आला, तसेच नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत चे सरपंचपती अशोक भोपळे उपसरपंचपती गोपाल फंदाट, ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, गजानन वानखडे , सुनील बेलोकार ग्रामसेवक , लिपिक ज्ञानदेव वानखडे , गणेश बगाडे , योगेश जुमडे, शांताराम दादरे उपस्थित होते.
यावर्षी या ग्रामपंचायत मध्ये हा पहिलाच प्रत्यक्ष नोंदणी विवाह झाला आहे. अशा प्रकारे विवाह केल्यास खर्चाला सुध्दा आळा बसतो आणि वेळ ही वाचतो, यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले आहे.