संग्रामपुर : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना संसर्गाला आता राज्यातही सुरुवात झाली आहे .अशातच मुंबई , पुणे सारख्या शहरात आता या विषाणु चा फैलाव वाढत आहे. संग्रामपुर व परिसरातही अनेकांना सर्दी ,ताप, खोकला असे आजार दिसून येत आहेत व मुंबई,पुणे सारख्या शहरातून संग्रामपुर परिसरात येणाऱ्या रुग्णावर लक्ष् ठेऊन त्याची माहिती संबंधित आरोग्य व नगर पंचायत प्रशासनाला देन्यासबंधी आज १९ मार्च २० रोजी संग्रामपुर न.प. ने खाजगी डॉक्टरांची कार्यशाला घेतली. कोरोना संबधी घ्यावयाची काळजी , शासकीय यंत्रनेला करावयाची मदत अशा संबधी या कार्यशाळेत आरोग्य निरीक्षक श्री. नागापुरे यांनी शहरातील खाजगी आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, यावेळी शहरातील सर्वच खाजगी डॉक्टर उपस्थित होते.
previous post