April 11, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

कोरोना बाधीतासाठी गृह अलगीकरण नाहीच,संस्थात्मक अलगीकरणाचा पर्याय

खामगांव : आजपासून covid-19 चे लक्षणे किंवा त्रास नसणारे कोरोना पँझिटिव्ह पेशट साठी होम आयसोलेशन सुविधा बंद करण्यात येत असून आता खेड्यातील रुग्णास गावातील शाळेमध्ये किंवा इतर उपलब्ध सोईच्या ठिकाणी आयसोलेट केले जाईल. तर खामगाव शहरातील रुग्ण यापूर्वी सुरू असलेले घाटपुरी कोविड सेंटर किंवा पॉलिटेक्निक कॉलेज हॉस्टेल (जलंब रोड) ,महिला पेशंट असल्यास पंचशील धर्मांर्थ दवाखाना (शाळा क्र 6 जवळ) या ठिकाणी आयसोलेट राहतील. असे नियोजन प्रशासनाने केले असून भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास आणखी ५ ठिकाणे शोधण्यात आली आहेत. ग्रामीण भागात पेशंटने आपले स्वतःचे अंथरून वापरायचे असून त्यांचे कुटुंबीय जेवणाचा डबा पोचवतील. सेंटरवर पाणी, लाईट , साफसफाई ची व्यवस्था ग्रामपंचायत कडे दिली आहे तर शहरामध्ये ही जबाबदारी नगर परिषद करणार आहे. संबंधित गावाच्या आशा वर्कर पेशंटची रजिस्टर मध्ये नियमित नोंदी घेऊन त्यांचे रेग्युलर चेकअप करतील. काही त्रास असल्यास पेशंट खामगाव sdh ला रेफर करण्यात येईल. याकामी पेशंट ला शाळेत पोचवण्यासाठी जबाबदारी ग्रामसमिती सदस्य तर शहरात कर्मचारी टीम नेमली जाईल. पेशंटने नकार दिल्यास त्या गावचे बिट जमादार /पोलीस चे मदत घेऊन पेशंटला सेंटर वर पोहचवण्यात येईल. सदर प्रकरणी इतर कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा ड्युटी लावली जाणार आहेत. त्याचे आदेश ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी तर शहरी भागासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडून काढण्यात येत आहेत. या कामी सर्व नागरीकांनी सहकार्य करावे ही बाब रुग्णासह कुटुंबाचे हिताची असून पॉझिटिव्ह रुग्णानी नेमून दिलेल्या ठिकाणी आयसोलेशन मध्ये राहावे, जेणे करुन कुटुंबीय व इतर्राना संसर्ग होणार नाही व कोरोना साखळी तुटण्यास मदत होईल. या नवीन नियमांची सदर अमलबाजवणी उद्या पासून सुरू होणार आहे. याप्रसंगी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या परिसरातील गावातील आयसोलेशन सेंटर साठी आवश्यक ते सहकार्य करावे योगदान द्यावे असे उपविभागीय अधिकारी खामगाव राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.

Related posts

‘मुहम्मद पैगंबर सर्वांसाठी’ अभियानातून उभारणार सामाजिक चळवळ

nirbhid swarajya

सिल्व्हरसिटी रूग्णालयाचा वर्धापन दिन रक्तदान करून साजरा

nirbhid swarajya

शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!