November 20, 2025
नांदुरा

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर गुन्हा दाखल

नांदुरा : शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासने प्रयत्न करीत असताना एका चालकाने आपली माहिती दडवून, खोटे बोलून नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले, परंतु त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्यावर उपचार करणारे १० कर्मचारी क्वारंटाईन
करण्यात आले आहे. सदर रुग्णावर तहसीलदार राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर रुग्ण वास्तव्यास असलेला राखोंडे पुरा परिसर सिल करण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार राहुल तायडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन बढे यांनी दिलेल्या संयुक्त माहीतीनुसार, सदर कोरोना पॉझीटीव्ह २८ वर्षीय इसम हा
सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात ताप असल्याचे सांगून उपचार घेत होता. तसेच बाहेरगावी गेलो नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रा.आ. केंद्रात त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतरही त्याचा ताप कमी होत
नव्हता व घशातही त्रास होत असल्याने त्याची कोवीड १९ ची तपासणी केली असता तो कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आला, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने सुरत खंडवा येथे गेला असल्याचे सांगितले. सदर रुग्ण वारंवार सूचना देऊनही शारीरिक अंतर राखत नसे, चेहऱ्यावर मास्क लावत नव्हता. त्यामुळे कलम २६१,२७०,१८८ नुसार साथीचा रोग अधिनियम १९८७ कलम ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम २००५ कलम ५१ नुसार तहसीलदार राहुल तायडे यांच्या फियार्दीवरुन वरील कोरोना पॉझीटीव्ह रुगणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Related posts

शेगाव तहसीलची अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर धडक कारवाई

nirbhid swarajya

मराठा पाटील युवक समिती च्या वतीने शाखा डोलारखेड येथें मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

तालुकास्तरीय महाआवास अभियान पुरस्कारांचे वितरण ग्रामपंचायत लासुरा खुर्द ला मिळाला प्रथम पुरस्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!