January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुलडण्यात केंद्राचे पथक दाखल

तपासणी करीता ३ दिवस राहणार तळ ठोकून….

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालय फुल्ल झालेले आहेत. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे दुय्य सदस्य असलेले पथक आज गुरुवारी 8 एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहेत.हे पथक तिन दिवस बुलडाणा जिल्ह्यात तळ ठोकून राहणार असून जिल्ह्याची कोरोना संदर्भाची संपूर्ण
माहिती घेणार आहेत. महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोना उद्रेक झालेला आहे. वाढत्या कोरोना  रुग्णामुळे शासयकिय यंत्रणेवर ताण वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी केंद्राकडून महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्यात आले आहेत.यात बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे.

बुलडाणा जिल्ह्यात देखील नॅशन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल विभागाचे उपसंचालक प्रा.डॉ.नविन शर्मा आणि डॉ.थ्रितीदास या दोन केंद्रीय सदस्याचे पथक आज गुरुवारी ८ एप्रिल रोजी बुलडाण्यात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी कांबळे यासह संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर या पथकाने कोविड रुग्णालयात चौकशी करीता भेट दिली. यावेळी त्यांनी कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सचिन वासेकर यांचेशी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णासंदर्भात, येणाऱ्या अडीअडचणी व रुग्णालयातील औषधी संदर्भात माहिती जाणून घेतली. यानंतर आरटीपीसीआर लॅबमध्ये जावून लॅबचे प्रमुख डॉ.प्रशांत पाटील यांचेशी देखील लॅब संबंधी सर्व माहिती जाणून घेतली. यासह पथकाने कोविड अपंग विद्यालयामध्ये जावून पाहणी केली. यावेळी त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे, डॉ.सुरेश घोलप यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. हे केंद्रीय पथक आजपासून तिन दिवस बुलडाणा जिल्ह्यात राहणार असून जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोन व कोविड रुग्णालयाचे तपासणी करणार आहेत.

Related posts

जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार…

nirbhid swarajya

‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार ९७ टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’

nirbhid swarajya

तरूणाई मध्ये महापुरूषांचे विचार रूजविण्यासाठी श्री तानाजी व्यायाम मंडळाचा नाट्यरूपी जीवंत देखावा

nirbhid swarajya
error: Content is protected !!