खामगांव : संपुर्ण महाराष्ट्रामधे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काल एका दिवसात २५ हजार कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता दोन दिवसा पहिले जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी आदेश काढून खामगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज शाळा क्र. ६ मध्ये आज दुपारी १२ वाजेपासून व्यापाऱ्यांची पूर्ण टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. टेस्टिंग साठी आलेले व्यापारी कुठल्याही प्रकारचा सोशल डिस्टंसिंग पालन करताना दिसून आले नाही. सकाळी १२ वाजेपासुन आलेले सर्व व्यापारी १ ते १:३० तासापसून या ठिकाणी उभे आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठलीही नियोजन नसल्यामुळे व्यापाऱ्यांना तात्काळत उभे राहावे लागत आहे. उन्हाचा पारा सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे अशातच नगरपरिषद प्रशासन कडून याठिकाणी व्यापाऱ्यांसाठी कुठलीही नियोजन केलेलं दिसून येत नाही आहे.तर एकीकडे प्रशासनाने ही वारंवार सांगूनही व्यापारी वर्गाकडून सोशल डिस्टंसिंग पालन होताना दिसून येत नाही आहे. स्वॅब देण्यासाठी व नाव नोंदवण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकच गर्दी या ठिकाणी केली आहे.या सर्व सहकारामुळे एकच लक्ष येते की प्रशासनाकडून कुठलीही नियोजन दिसत नाही आहे तसेच खामगाव मध्ये विना मास्क किर्तन सुद्धा लोक दिसत आहे. नगर परिषद कडून दोन दिवस कारवाई करण्यात येते व त्यानंतर कुठल्या प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही त्यामुळे नगरपरिषदेचा संपूर्ण ढीसाळ यावरून नियोजन दिसून येते.