चिखली : देशावरच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कोरोना महामारीचे जाळे पसरले आहे. अशातच भारतात सर्वाधिक जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून आजची स्थिती बघता येत्या काळात महाराष्ट्रावर मोठं संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कोरोना विरोधात लढणारे आणि आरोग्य सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, वार्ड बॉय तसेच महसूल आणि पोलिस विभागातील अधिकारी , कर्मचारी कर्मचारी यांना चांगल्या दर्जाची संरक्षक साधने नसल्याचे दिसून आले. त्यामूळे कोरोना विरोधात काम करणाऱ्या लोकांना मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट आणि ग्लोव्हज सोबत इतर मेडिकल साधने घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील कव्हळा येथील महिला पोलीस पाटील शीला जाधव यांनी आपले शासनाकडून मिळणारे वर्षभराचे मानधन आणि त्यांचे पती देवानंद जाधव यांच्या वाढदिवसाला लागणारा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधील देऊ केले आहेत.असे एकूण ७५ हजार रुपये हे मुख्यमंत्री निधी ला दिला आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधन या मदत निधीतून हि साधने उपलब्ध करुन देण्याची मागणी हि त्यांनी शासनाकडे केलीय. तस पत्र हि त्यांनी अमडापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना पोलीस पाटील शीला जाधव यांचे पती देवानंद जाधव यांनी दिले आहे. तसेच इतरांनाही आपल्या परीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
next post