श्रींच्या मंदिरात भाविकांच्या गर्दीविना ” रामनवमी “
शेगांव : श्री राम जय राम जय जय राम आणि गण गण गणात बोते चा गजर करीत टाळ मृदंगधारी वारकरी, अश्व, गजासह हजारो भाविक श्रींच्या पालखी मिरवणुकीत रामनवमी निमित्त संत नगरी शेगावात पाहावयास मिळत होते. मात्र कोरोना मुळे पालखीची १२५ वर्षाची परंपरा आज खंडित झाली. अत्यंत साध्या पद्धतीने रामनवमीच्या पूजा अर्चना श्री संत गजानन महाराज मंदिरात पार पडल्याची माहिती आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते. त्यानिमित्ताने गुढीपाडव्यापासून श्री गजानन महाराज संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात आणि शहरातून श्रींची पालखीची मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा संसंर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यभरातील मंदिरे बंद करण्याचे आदेश दिल्याने १२६ वर्षाची पालखीची परंपरा खंडित झाली.कुठलाही गाजावाजा आणि गर्दी ना जमवता संस्थान मध्ये पुजाऱ्यांनी पूजा अर्चना करीत रामनवमी पार पाडलायची माहिती प्राप्त झाली आहे. कोरोनामुळे मंदिर बंद ठेवन्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत त्यामुळे शेगावात 125 वर्षा नंतर पहिल्यांदाच रामनवमीला भविकांची गर्दी दिसली नाही. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातुन लाखो भाविक रामनवमीला शेगावात येतात. महाराजांच्या कार्यकाळातच संस्थानमधे रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली होती. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून शेगांवची रामनवमी यात्रा प्रसिद्ध होती.125 वर्षापासून रामनवमीचा सोहळा भविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. मात्र या वर्षी कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातले आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवन्याचा आदेश देण्यात आला. भाविकात देव पाहणाऱ्या संत गजानन महाराज संस्थाननेही भविकांच्या सुरक्षेकरिता मंदिर बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यामुळे या वर्षी रामनवमीला मंदिरात व शेगावात पहिल्यांदाच भावीकांची गर्दी दिसली नाही.