January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा

कोरोनावर मात केलेल्या ९ रुग्णांना देण्यात आली सुट्टी..

आता जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण 22 तर 3 मृत्यु 

खामगाव : खामगाव सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ९ रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये जळका भडंग येथील ८ व टूनकी बावनबीर येथील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना या सर्व ९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या रुग्णांचा दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना सुट्टी नियमानुसार सुट्टी देण्यात आली आहे. जळका भडंग येथे पुण्याहून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील हे सर्व जळका भडंग येथील हे ८ रुग्ण व टूनकी बावनबीर येथील रुग्ण बाहेगावाहून आल्याची माहिती आहे तसेच सुट्टी झालेल्या ९ रुग्णांमध्ये ५ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे.कोरोना वर मात केल्याने या रुग्णांनाजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. टापरे तसेच रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर व सर्व स्टाफ उपस्थित होते. रुग्णालयातून बाहेर पडताच रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.  कोरोना वर मात केल्यामुळे आनंदित होऊन हे रुग्ण घरी परतले. शासनाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या रुग्णांना घरपोच सोडण्यात आले.यावेळी फिजिकल डिस्टन्ससिंग पाळा, हॅण्ड सेनीटायझर चा वापर करा, मास्क वापरा व घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी नागरिकांना केले. 

एकाच दिवशी ९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने ही बातमी खामगाव तसेच जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. तसेच जिल्ह्यात एकूण ६९ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत ४२ कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ४२ आहे व आतापर्यंत १२७४  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असून २२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Related posts

लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !

nirbhid swarajya

लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे माजी नगरसेवकाने केले शारीरिक शोषण

nirbhid swarajya

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० क्विंटल तांदूळ पकडला चार लाखांचा मुद्देमाल जप्तः दोघांविरोधात गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!