January 4, 2025
जिल्हा

कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाचे पुष्पवृष्टी करून केले स्वागत

शेगांव : बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणजे पाच रुग्णांनी कोरोना वर विजय मिळवला आहे, उपचार घेतल्या नंतर या पाच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती, बुलडाणा जिल्ह्यात २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यामधील एकाच मृत्यू झाला होता तर २० रुगणांवर जिल्हा स्त्री रुग्णालयातील आयसोल्युशन वॉर्ड मध्ये उपचार सुरू होते त्यापैकी १७ एप्रिल रोजी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती तर काल परत पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना देखील टाळ्या वाजवत निरोप देण्यात आला. आज रोजी जिल्ह्यात १२ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. खऱ्या अर्थाने या रुगणांवर दिवसरात्र उपचार करून रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे पाहत आरोग्य कर्मचाऱ्यांना युद्ध जिंकल्यासारखे आणि मेहनतीचे चीज होत असल्याच्या भावना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. शेगाव येथे कोरोना मधून एक रुग्ण बरा होऊन परत आल्याने सायंकाळी त्याचे शेगाव येथील अशापकुल्लाह चौकात पोलीस प्रशासन, आणि नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून आणि टाळया वाजवून स्वागत केले आहे.

Related posts

अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला

nirbhid swarajya

बास्केटच्या माध्यमातून भाजीपाला वितरण

nirbhid swarajya

संकटकाळात वंचित बहुजन आघाडी गरिबांच्या मदतीला

nirbhid swarajya
error: Content is protected !!