अध्यात्माच्या साथिन केली शेताची राखण
जळगाव जा. : जगामधे सर्वदूर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. एकीकडे सरकार वयोरुद्ध लोकांना घरा बाहेर न निघण्याचे आवाहन करताना दिसत आहे. मात्र अशातच बुलडाणा जिल्हयातील संग्रामपुर येथील ७५ वर्षीय रामेश्वर आंबलके या आजोबाने कोरोनाच्या भीतिने गेल्या तीन महिन्यापासुन आपल्या शेतात बांधलेल्या एका मंचनावर स्वतःला विलागिकरण करुन जीवन जगत आहेत. इतकेच नाही तर त्यानी अध्यात्माच्या साथीन ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन सुरु केले आहे. यासोबतच या आजोबानी आपल्या शेताच आणि शेतातील पिकाच जंगली प्राण्यापासून रक्षण सुद्धा केले आहे.व चांगले पीक सुद्धा घेतले आहे. आजोबानी लॉकडाउन काळात एकनाथी भागवताच पारायण आपल्या मंचनावरच सुरु केल आहे , सध्या त्यांनी ज्ञानेश्वरी पारायणाचे १० अध्याय पूर्ण केले आहेत.कोरोना मुळे मानवाच जीवन कस बदललय हेच यावरून अधोरेखित होत.