गुडी च्या माध्यमातून सेवेत असणाऱ्या घटकांचा सन्मान करणारी गुडी
जळगाव : संपूर्ण देशात कोरोना वायरस ने थैमान घातले आहे, ते रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, तर आज गुडीपाडवा आहे आणि याच दिवशी अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या गुढ्या उभारण्यात येत आहेत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव मध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे डॉक्टर आणि इतर घटकांचा सन्मान करत कोरोना जनजागृती करत डॉ सौ स्वाति वाकेकर यानी आपल्या स्वतः च्या रुग्णालयात कोरोना विषयक संदेश देणारी गुढी उभारली आहे. गर्दी टाळा, स्वतःची काळजी घ्या असा संदेश या गुढीद्वारे देण्यात आला आहे. या गुढ़ीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.