खामगांव येथे तालुकास्तरावरील महाराष्ट्रातली पहिलीच आरटीपीसीआर लॅब व ऑक्सीजन प्लांन्ट़ लवकरच सुरु होणार
खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा अँड. आकाश फुंडकर यांनी सामान्य़ रुग्णालय खामगांव येथे आढावा बैठक घेतली. राज्यात नुकतीच कोरानाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. शासनाने तीसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी सामान्य़ रुग्णालय खामगांव येथे आढावा बैठक घेण्यात आली. येत्या काळात उदभवणा-या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आरोग्य़ सेवा सतर्क ठेवण्यासोबतच भविष्यात उदभवणा-या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खामगांव येथे महाराष्ट्र्रातील तालुकास्तरावरील पहिला आर.टी.पी.सी.आर.लॅब सुरु होणार आहे. त्याची आज आ.आकाश फुंडकर यांनी पाहणी केली. या लॅबची दररोज १००० चाचण्याची क्षमता आहे. त्यामुळे आर.टी.पी.सी. आर. चे रिपोर्ट आता तात्काळ मिळणार आहे. त्यामुळे रिपोर्ट मिळेपर्यंत सदर कोरोना संसर्ग झालेला रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत असे. परंतु आता तात्काळ रिपोर्ट मिळाल्यामुळे सदर रुग्णाचे विलगिकरण करता येऊन कोरोना संसर्गात होणारी वाढ आटोक्यात आणणे शक्य़ होईल. यासोबतच कोरोना संशयीत रुग्ण़ाची देखील उशीरा रिपोर्ट मिळाल्यामुळे होणारी मनाची घालमेल थांबणार आहे.
तसेच येत्या काळात कोरोनाच्या तिस-या लाटीमुळे उद़भवणा-या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रुग्णांना कोरोना काळात लागणारी ऑक्सीजनची गरज भागविण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत ऑक्सीजन प्लांन्ट़च्या कामाची देखील पाहणी आ.ॲड आकाश फुंडकर यांनी केली. ऑक्सीजन प्लांन्टमधून दर मिनीटाला ५०० लि.ऑक्सीजनची निर्मीती करण्यात येणार असून येत्या काळात कोरोनाच्या तिस-या लाटीमुळे उदभवलेल्या परिस्थितीत लागणारी ऑक्सीजनची गरज यातून भागवल्या जाणार आहे. कोरोनाच्या तिस-या लाटीच्या अनुशंगाने उदभवणा-या परिस्थितीत लहान मुलांसाठी स्वतंत्र बाल रोग कक्ष स्थापन करण्याचे निर्देश यावेळी आ.आकाश फुंडकर यांनी दिले. तसेच उपरोक्त़ आर.टी.पी.सी.आर. लॅब व ऑक्सीजन प्लांन्ट़ तात्काळ कार्यान्वीत करण्याबाबतचे आदेश आ. ॲड आकाश फुंडकर यांनी या आढावा बैठकीत यावेळी दिले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे, उद्योग आघाडी अध्यक्ष प्रमोद अग्रवाल, विपुल ठक्कर, प्रमोद देशमुख, उमेश बरालिया, सुरेश घाडगे, संदीप वर्मा, संजय शिनगारे, राम मिश्रा, पवन गरड, गणेश बाप्पू देशमुख, शुभम देशमुख, मयुरजी घाडगे, अभिषेक पिंपळकर, भावेंद्र दुबे, प्रसाद एदलाबादकर हे या पाहणी दरम्यान उपस्थित होते.