जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला प्रसाद
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या सरकारी निर्णयाला काही नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी राज्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात सर्व रस्त्यांवर, बाजारपेठेत आणि बसस्थानकात आणि नेहमी गजबजणाऱ्या नागपूर- मुंबई महामार्गावर शुकशुकाट पसरला आहे.
मात्र शहरात अनेक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या युवकांना पोलिसांनी प्रसाद दिला. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शहरे लॉकडाऊन झालेली आहे मात्र अनेक ठिकाणी काही शौकीन लोक शहरांचा फेरफटका मारतांना दिसत असल्याने सकाळ पासून बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शहरांमधील पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे. कर्फ्यू हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, याचं गांभीर्यच जर लोकांना कळत नसेल आणि सरकारच्या आदेशाचं उल्लंघन केलं जात असेल तर अशा पद्धतीची कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत पोलिसांकडून व्यक्त होत आहे.