सिंदखेड राजा स्थित जाफराबाद येथील सुप्रसिद्ध बायोटेक कंपनी ईश्वेदला कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या विज्ञान विभागाची शैक्षणिक सहल संपन्न झाली. सर्वप्रथम प्रवेश द्वारावर आम्हा सर्वांचे स्वगत करण्यात आले. या नंतर लगेच विज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. धनश्री चंदन यांनी सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यासह पुष्पगुच्छ देऊन कंपनीचे संचालक संजयजी वायाळ यांचे वडील भानुदासजी वायाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट घेतली. आम्हा सर्वांची रीतसर त्याच्याशी भेट मार्केटींग मॅनेजर स्नेहल ढवळे यांनी करून देत आमचा ईश्वेद कंपनीचा पुढील प्रवास सुरु झाला. या मध्ये अनुक्रमे बॉटल वॉशिग, डिपार्टमेंट बॉटल गॅरेज, मिडिया प्रिपरेशन, ग्रोथ रूम, प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग , मार्केट तसेच सर्व विविध डिपार्टमेंट ची इतम्भूत माहिती अत्यंत उपयुक्त पद्धतीने प्रभाकर सर, किरण सर, नगरे सर, स्नेहल ढवळे यांच्या सह ईश्वेद या कंपनीमध्ये प्रत्यक्ष कार्य केलेल्या मात्र सध्य स्थितीत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट च्या प्रा. स्नेहा सावळे यांनी अत्यंत योग्य पद्धतीने कार्याचा आढावा देत कंपनीतील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्नेहल ढवळे यांनी ईश्वेद कंपनीचा १० वर्षाचा गोषवारा सांगताना संजय वायाळ सर जे स्वतः विदेशात कार्य करत होते मात्र मी जिथून आलोय त्या लोकांसाठी मला काही करायचे आहे. आणि ईश्वेद कंपनीची निर्मिती केल्या गेली. त्याद्वारे हजारो गरज वान्ताना रोजगार देण्याचे त्यांची स्वप्नपूर्ती पूर्णत्वास आली.ईश्वेद कंपनीची संपूर्ण माहिती संवादात्मक रित्या माहिती सर्व विभागाच्या इन्चार्ज यांनी विद्यार्थ्यांना दिली. या सर्व टीमने विषयाची कुतुह्लता असणार्या विद्यार्थ्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करीत त्यांची उत्तरे त्यांना दिली. छोटेसे रोपटे तयार करण्याची व्यवस्था, त्यांची जपवणूक अगदी लहान बाळाप्रमाणे करीत त्याला सुदृढ बनविण्याच्या प्रक्रिया पर्यंत सर्वांच्या छोट्या मोठ्या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्याच्या वतीने झाली. याद्वारे विद्यार्थ्यांनी पाहिजे ती माहिती संग्रहित केली . या नंतर सहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. त्यानंतर मोजक्या आणि थोड्या वेळात विज्ञान विभागाचा आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचा नवोदित गायक मोहम्मद नवाब यांच्या गीत गायनाने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला.अशा तऱ्हेने अत्यंत उपयुक्त अशीही शैक्षणिक सहल संपन्न झाली. यावेळी विज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख धनश्री चंदन, प्रा. स्नेहा सावळे, प्रा. कोमल उन्हाळे, सौ. वंदना जाधव, आय.टी.आय. विभाग प्रमुख आकाश खंडेराव, विकास पल्हाडे यांच्या सह विज्ञान विभागाचे बहु संख्य विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी होते.
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ विविध लेख शिक्षण सामाजिक सिंदखेड राजा