कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या ईडी कारवाई विरोधात सानंदांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने
खामगांव:कॉंग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी वाढती महागाई,बेरोजगारी,शेतकरी विरोधी धोरण यासह मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सतत आवाज उठविला आहे.त्यामुळे केंद्रातील षडयंत्रकारी मोदी सरकार गांधी घराण्याला बदनाम करुन त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावुन दडपशाहीचे धोरण वापरत आहे.केंद्रातील मोदी सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात असून केंद्र सरकारची ही हुकुमशाही कदापी खपवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.आज सोमवार दि.२० जून २०२२ रोजी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगांव मतदार संघातील कॉंग्रेसजणांच्या वतीने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी व कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने षडयंत्र रचुन राजकीय सुडबुध्दीतुन केलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात खामगाव येथील टॉवर चौकात धरणे आंदोलन करुन तीव्र निशेध करुन निदर्षने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाया करीत आहे.ज्या गांधी परिवाराने भारत देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले,त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या हुकुमशाहीला कॉंग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने सतत चोख उत्तर देत राहील. मोदी सरकारच्या या हुकुमशाही विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.आंदोलनात बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख यांनी संचालन करुन मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात उपस्थितांना मार्गदर्शन.या धरणे आंदोलनामध्ये खामगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले,माजी पं.स.उपसभापती चैतन्य पाटील, यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व संघटना सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.