केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.
‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत उचलले पाऊल ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना याबाबत पत्र दिले आहे.
२० जुलै रोजी आदेश भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे.
दिवस- रात्र फडकवता येणार तिरंगा ध्वज संहिता-२००२ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१ अंतर्गत राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम सांगण्यात आले आहेत. या ध्वज संहितेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता. तसेच पॉलिस्टरचे आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांना परवानगी नव्हती. मात्र, आता पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करण्याची परवनागी देण्यात आली आहे. तसेच २४ तास तिरंगा फडवण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
अकोला खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर मोताळा विदर्भ शेगांव संग्रामपूर