खामगांव : केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत,याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी खामगाव तालुक्याच्या वतीने आज बसस्थानकासमोर एक दिवसीय डफली बजाव आंदोलन करुन बस सेवा पूर्ववत चालू करण्यात यावी या संदर्भात शासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठीचे निवेदन उपविभागीय कार्यालयाच्या मार्फत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना केली आहे. अनेक महीन्यापासून लॉकडाऊन मुळे बस सेवा बंद असून, त्यामुळे सर्व बस कर्मचाऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ग्रामिण भागातील तालुक्याच्या ठिकाणी शाळकरी मुले, व शेतकरी, छोटे व्यवसायीक व आजारी व्यक्ती यांना दवाखान्यात येण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. दळण-वळणाची साधने बंद असल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे खूप हाल होत आहे. छोटे-छोटे व्यवसाय बंद पडलेले आहे. त्याचेवर उपासमारीची पाळी आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बस सेवा चालू करणे गरजेचे आहे.खामगाव संपूर्ण बस सेवा चालू करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
previous post
next post