December 29, 2024
खामगाव जळगांव जामोद बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय व्यापारी

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव १८ सप्टेंबर पासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात!

‘मिशन ४५’ अंतर्गत दौरा;खा.जाधवांसह शिंदे गटाची वाढली धाकधूक!!

खामगाव :दोन वर्षांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भिडलेल्या भाजपच्या ‘ मिशन- 45’ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अग्रक्रमावर आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रभारी ना. रावसाहेब दानवे, खा. अनिल बॉंडे यांनी याचा बुलढाण्यात पुनरुच्चार केला. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय श्रम, रोजगार,वन मंत्री भूपेंद्र यादव हे उद्या पासून मतदारसंघात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे.यानंतर नियमित अंतराने होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात( १८ व १९ सप्टेंबर) खामगाव व जळगाव विधानसभा मतदारसंघात ते जवळपास पूर्णवेळ हजेरी लावणार आहे.कसा आहे दौऱ्या श्रम,रोजगार,वन,पर्यावरण व जलवायू परिवर्तन केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव १८ व १९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात येत असून १८ ला खामगाव मतदार संघ तर १९ तारखेला जळगाव जामोद तालुक्याचा दौरा करणार आहेत.खामगावचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर व जळगाव जामोदचे आमदार डाँ.संजय कुटे हे त्याचे सोबत असणार आहेत.केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांचा दोन दिवसीय दौरा खालील प्रमाणे असणार आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावरून औरंगाबाद कडे ते प्रयाण करणार असून ७ वाजून २० मिनिटांनी औरंगाबादच्या विमानतळावर त्यांच आगमन होणार आहे.तेथून शासकीय वाहनाने देऊळगाव राजा येथे उदयकुमार छाजेड यांचे निवासस्थानी भेट व जनसंघाच्या कार्यकर्त्यांसोबत भेट व अल्पोहार करून ९ वाजून ३०मिनिटांनी खामगाव कडे प्रयाण करणार आहे.येतांना हिवरखेड येथील राष्ट्रीय प्रकल्पाला भेट त्यानंतर ९ वाजून ४५ वाजता खामगावच्या ऐतिहासिक टिळक राष्ट्रीय विद्यालयाला ते भेट देणार आहेत. दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी रोणा येथील सेवा सप्ताह शुभारंभ व रक्तदान शिबिरात उपस्थिती,१ वाजता श्रीहरी लॉन्स खामगाव येथे आमदार आकाश फुंडकर यांच्यासोबत भोजन,१ वाजून ३० मिनिटांनी संघटनात्मक कार्यक्रम व भाजपा लोकसभा कोर कमिटी सोबत बैठक.३ वाजता मोर्चा व पदाधिकारी यांचे सोबत बैठक.३ वाजून ४५ मिनिटाला बुलढाणा लोकसभेच्या क्षेत्र लाभार्थ्यांना कोल्हटकर स्मारक मंदिर येथे मार्गदर्शन तर ४ वाजून ४५ मिनिटाला श्री हरी लॉन्स येथे मतदार आणि सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी ,उद्योजक, डॉक्टर, वकील व नवीन मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. ५.३० वाजता श्रीहरि लाँन्स येथे मिसाबंदी व कार्यकर्त्यांसोबत बैठक.६ वाजता आमदार आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भोजन. ७ वाजता जिल्हा परिषद सदस्य सरपंच व इतर लोकप्रतिनिधी सोबत बैठक. ७ वाजून ३० मिनिटाला एस पी ९५ राष्ट्रीय पेन्शन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक.यादरम्यान खामगावचे आमदार आकाष फुंडकरांची उपस्थिती त्याच्या सोबत असणार आहे.७ वाजून ४० मिनिटांनी शेगाव साठी प्रयाण. रात्री ८ वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे स्थानिक पत्रकारांसोबत मुलाखत यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुठे यांची उपस्थिती राहणार आहे.९ वाजता भाजपाच्या आय.टी.सेल,सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. रात्री १० वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे मुक्काम.दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता स्थानिक न्यूज चैनल यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह शेगाव येथे मुलाखत.८ वाजता संत श्री गजानन महाराज मंदिराला ते भेट देणार असून ९ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील विहिरीला भेट.९ ३० वाजता सार्वजनिक पन्ना प्रवास कार्यक्रमाला उपस्थिती.१०.३० वाजता पातुरड्यातील सरस्वती वाचनालय येथे मुख्य मतदारांसोबत भेट. १२ वाजता जळगाव जामोद येथे “स्वतंत्रता का अमृत महोत्सव” यानिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीत केंद्रीय मंत्र्याचा सहभागी होणार आहेत. यादरम्यान डॉक्टर संजय कुटे हे सोबत राहणार आहेत. १२.३० दि. न्यु.ईरा हायस्कूल जळगाव जामोद येथे भाजपा महिला मोर्चाच्या प्रतिनिधी सोबत भेट.१२.४५ ला उर्दू हायस्कूल येथे सेवा सप्ताहाचे शुभारंभ. १ वाजता डॉक्टर संजय कुटे यांचे निवासस्थानी भोजन करणार असून,१.३० वाजता गीता भवन येथे समाजातील दुर्बल घटकांसोबत बैठक तर २ वाजता कुणाल गुंडाळे यांच्या निवासस्थानी भेट.३ वाजता खांडवी येथे कोविड मुळे मृत्यू झालेल्या रामदास उखरडा लांडे यांचे निवासस्थानी भेट.३.१५ ला जळगाव जामोद वरून बुलढाणा कडे प्रयाण यावेळी आमदार डॉक्टर संजय कुठे त्यांच्यासोबत राहणार आहेत.४.३० वाजता मलकापूर रोडवरील भाजपा जिल्हा कार्यकर्त्यांच्या नियोजित जागेला भेट यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती त्यांच्यासोबत असणार आहे. ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे शासकीय बैठक.६.१५ ला नियोजित भवन येथे पत्रकार परिषद. ७ वाजता योगेंद्र गोडे जिल्हा महामंत्री यांचे निवासस्थानी भोजन तर संध्याकाळी ७.३० बुलढाणा वरून औरंगाबाद कडे प्रयाण करणार आहेत. अशी माहिती बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी खामगाव येथील विश्रामगृह घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये दिली आहे.यावेळी माजी नगरसेवक सतीशआप्पा दुडे व वैभव डवरे यांची उपस्थिती होती

Related posts

तर मिरवणुका, आंदोलने, सभा ‘या’ कारणामुळे रद्द होणार

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 84 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 21 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी जारी केला हेल्पलाईन नंबर

nirbhid swarajya
error: Content is protected !!