खामगांव : विधानसभा मतदार संघातील जवळपास 15 कोटी रुपयांच्या रस्ता कामांना मंजूरी खामगांव विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांची मजबूतीकरण व रुंदीकरणाची कामे आवश्यक़ होती याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सदर रस्ता कामांना मंजूरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत खामगांव विधानसभा मतदार संघातील जवळपास 15 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरात देण्यात आली आहे. त्याबददल खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानुन खामगांव विधानसभा मतदार संघातील जनतेकडून धन्यवाद मानले. खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी खामगांव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनेक वर्षापासून प्रलंबीत अशा अत्यंत महत्वाच्या रस्ताचे मजबूतीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खामगांव विधानसभा मतदार संघातील रु 15 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरात दिली आहे. याबाबत त्यांनी पत्राव्दारे आमदार ॲड आकाश फुंडकर यांना सुचीत देखील केले आहे.
या कामांमध्ये खामगांव मतदार संघातील 1 प्रमुख जिल्हा मार्ग 56 एमडीआर 15 वर्णा सारोळा, गेरु माटरगांव श्रीधर नगर हरनी वैरागड उंद्री रामा 222 ला जोडणारा रस्ता लांबी 17 किमी ते 24 किमी रु. 5.85 कोटी , 2.एमडीआर 57 रामा 222 वैरागड ते झोडगा वझर, रामा 222 गणेशपुर शि राळा निरोड ओडीआर 73 घारोड अकोली अडगांव रामा 269 ला जोडणारा कि मी 23 ते 30/400, किमी 30/400 ते 32/00 आणि 32 ते 33 किमी रु 4.43 कोटी , 3.एमडी आर 51रामा 222 माटरगांव. बेलुरा मोरगांव डिग्रस़, पहुरजिरा रामा 6 पारखेड ज्ञानगंगापूर ते एमडीआर13 ला जोडणारा रस्ता किमी 19 ते 28 पारखेड ते राहुड ते घाणेगांव नालीसह रु.9.00 कोटी या कामांचा समावेश आहे. या सर्व रस्ता कामांमुळे खामगांव मतदार संघातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरीकांना दळवळणास सोपे होणार आहे. तसेच येत्या काळात मतदार संघातील शेतकरी हे त्यांच्या शेतातील माल इतर बाजार पेठेस विकण्यास त्यांचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानले आहेत. या मंजूर कामांमुळे खामगांव मतदार संघातील ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये अजून भर पडणार आहे.