खामगांव:शहरात गेल्या अनेक दिवसापासून मुली पळून जाण्याचे प्रकार मोठया प्रमाणात वाढलेले आहे. त्याला कॅफे जबाबदार असल्याचे आरोप नागरिक खाजगीत बोलताना करीत आहेत.मात्र याकडे पोलिसांचेच अर्थ पूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा खामगाव शहरात सुरू आहे. मात्र कर्तव्यदक्ष अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त रुजू झाल्यानंतर या सर्व प्रकाराला आळा बसेल अशी शक्यता नागरिकांनी वर्तवली होती मात्र ती सबशल फेल ठरली, त्यामुळे या कॅफे चालकांनी आपली मुजोरी सुरूच ठेवली आहे. कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे कॅफे चालकांनी आपल्या कॅबिनला दरवाजे लावले आहेत. या कॅफेमध्ये कमी वयाच्या मुली सुद्धा येत असल्याची माहिती समोर आली आहे.आज अमृत नगर भागात राहणाऱ्या काही नागरिकांनी या कॅफे बाबत खामगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तक्रार सुद्धा केली आहे.निवेदनात नमुद केल्या नुसार जलंब रोड वरील निलेश इंगळे यांच्या मालकीच्या कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावरील हॉल मध्ये प्रफुल्ल करपे यांनी कॅफे हाईड अँण्ड सिक व सौरभ भोजने यांनी मेमोरेबल कॅफे या नावाने कॅफे हा व्यवसाय मागील काही महिन्यापासुन बेकायदेशीररित्या सुरू केलेला आहे, व या कैफे मध्ये युवा मुला – मुलीकरिता कॅबीन तयार करण्यात आलेले असुन तेथे त्यांना एकत्र बसण्याची व नाश्ता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे व त्याकरिता युवा मुला – मुलीना तासनतास् बसण्याची सोय करण्यात आलेली आहे व त्या करिता त्यांच्याकडुन खुप मोठी रक्कम तासाप्रमाणे स्वीकारून त्यांना स्वतंत्र कॅबीन देऊन तेथे मुलामुलीना अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे .त्याठिकाणी कॉलेजची मुले मुली एकत्र येऊन प्रचंड मनमानी करून अश्लील कृत्य करतात . अशा प्रकारे रहिवाशी जागेत व परिसरात बेकायदेशीर कृत्य कॅफे हाईड अँड सिक ,मेमोरेबल कॅफे मध्ये करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे .त्यामुळे जलंब रोडवरील अमृत नगर मधील कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंट येथील कॅफे हाईड अँण्ड सिक , मेमोरेबल कॅफे मधील बेकायदेशीर कृत्य बंद करण्यात यावे अशी मागणी विठ्ठल नगर ,अमृत नगर परिसरातील रहिवासी नागरिकांनी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व एस.डी.पी.ओ.अमोल कोळी यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. निवेदनावर विलासराव त्रिंबक देशमुख, ज्ञानदेवराव मानकर, पंकज जोशी, शरद गावंडे, पंकज गिरी ,श्रीकांत बाळकर, अतुल भावसार,शत्रुघण कुटे, अमोल राठोड, अजय ताकवाले, यांच्यासह आदी नागरिकांच्या सह्या आहेत या आधी निर्भिड स्वराज्य ने कॅफे आणि बरेच काही असे वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष…
नागरिकांचे उपस्थित प्रश्न…?
कॅफे चालू करतांना दरवाजे लावण्याची गरज का भासते ? हाही एक मोठा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. तसेच कॅफेमध्ये जाऊन निरीक्षण केले असता कॅफेमध्ये एकदम अंधार दिसून येतो. सदर कॅफेना कॅबिन बसवण्याचीच गरजच का आहे ? असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. या कॅफे बाबत अनेक नागरिकांनी भरपूर वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरीक करीत आहेत. आता कर्तव्य दक्ष अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का ? तसेच यामुळे एखादा गैरप्रकार झाला तर याला जबाबदार कोण? हाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
दामिनी पथक करते तरी काय..?
अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले दामिनी पथक करते तरी काय..? रोज शहरामध्ये दामिनी पथकाचे वाहन फिरताना दिसते मात्र त्यांचे या कॅफेकडे मधील गंभीर बाबी कडे लक्ष का जात नाही? असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. अपर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त रुजू झाल्यापासून दामिनी पथकाने कॅफेवर किती कारवाया केल्या..? किती कॅफेची तपासणी केली..? हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.