दामिनी पथकाची कॅफे वर कारवाई
खामगांव : कोरोनामुळे सर्वच शाळा व महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे २ वर्षापासुन मुले-मुली घरात राहून कंटाळले आहेत आता सर्व नियम शिथिल झाल्यावर या ना त्या कारणाने मुलं-मुली घराबाहेर पडत आहेत अशातच येथील डीपी रोडवर असलेल्या एका कॅफे मध्ये घरून खरेदी चे कारण सांगून तीन मुले व तीन मुली पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दामिनी पथक हे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करीत असताना डीपी रोड भागात गेले असता येथील डीपी रोडवरील मेमोरेबल कॅफे मध्ये तपासणी केली असतात बंददार आतमध्ये ईलू ईलू करत असतांना तीन मुले व तीन मुली त्यांना दिसून आले.
त्यांनी तीनही मुलींना व मुलांना ताब्यात घेऊन खामगाव शहर पोलीस स्टेशनला आणले आहे. याबाबतची माहिती त्या मुलांच्या पालकांना देण्यात आली होती. मुलगी साहित्य खरेदीसाठी बाहेर जाते असल्याचे सांगून गेली व मुलगी कॅफेमध्ये आढळून आल्याची बातमी कळताच एका मुलीच्या आईची तब्येत सुद्धा खालावली होती त्यामुळे तिच्या आईला दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. सदर मेमोरेबल कॅफे हा पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अनेक वेळा शहरातील कॅफे कारवाई केल्या कॅफे चालकांना नोटिसा बजावल्या होत्या. कॅफे मध्ये असलेल्या केबिनला असलेले सर्व दरवाजे काढून टाकावे. यासह अन्य सूचनासुद्धा पोलिसांनी त्यांना वारंवार दिल्या होत्या मात्र कॅफे चालकांनी या नोटिसला केराची टोपली दाखवली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मुली जाण्याचा पळून जाण्याचे प्रमाण मोठा प्रमाण वाढलेले आहे त्याला कॅफे जबाबदार असल्याचे सुद्धा आरोप हे नागरिक खाजगी वर बोलताना करीत आहे मात्र याकडे पोलिसांचेच अर्थ पूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा खामगाव शहरात सुरू आहे. त्यामुळे या कॅफे चालकांनी आपली मुजोरी सुरूच ठेवली आहे. कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे कॅफे चालकांनी आपल्या केबिनला दरवाजे लावले आहेत. या कॅफेमध्ये कमी वयाच्या मुली सुद्धा येत असल्याची माहिती समोर आली आहे. आज ज्या ठिकाणी प्रेमीयुगल पकडण्यात आले आहे तो कॅफे हा पोलिसाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाचे असल्यामुळे पोलिसांकडून त्याला नोटीस देऊन एक प्रकारचे अभय देण्यात आले आहे. या भागात राहणारे काही नागरिकांनी या कॅफे बाबत अनेक वेळ्या तक्रारी सुद्धा केल्या आहे, काही दिवस आगोदर या कॅफे वर पालकांनी अल्पवयीन जोडपे पकडले होते. यावेळी पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. मात्र हा कॅफे चालक पोलीस कर्मचार्याचा मुलगा असल्याने तो कोणाला जुमानत नसून सर्व नियम धाब्यावर बसून कॅफे चालवत आहे. कॅफे चालू करतांना दरवाजे लावण्याची गरज का भासते ? हाही एक मोठा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. तसेच कॅफेमध्ये जाऊन जर निरीक्षण केले असता कॅफेमध्ये एकदम अंधार दिसून येतो. सदर कॅफेना कॅबिन बसवण्याचीच गरज सुद्धा का आहे ? असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. या कॅफे बाबत अनेक नागरिकांनी भरपूर वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरीक करीत आहे. आता खामगाव शहर पोस्टेला नवीन ठाणेदार रुजू झाले आहे ते या गंबीर बाबीकडे लक्ष देतील का ? तसेच यामुळे एखादा गैरप्रकार झाला याला जबाबदार कोण? हाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.