खामगांव : कृषी उत्पन्न बाजार समितिच्या नुकत्याच झालेल्या ठरावानुसार खामगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या ग्रामसेवा सहकारी सोसायटिचे नामनिर्देशित सदस्य म्हणुन त्यांची संचालक म्हणुन माजी नगराध्यक्ष गणेश माने आणि उमेश चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तीन संचालकांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे दोन संचालक पदे रिक्त होते. त्या रिक्त जागेवर सदर निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.यावेळी सभापती संतोष टाले, संचालक दिलीप पाटील, सचिव भिसे, अॅड. मंदिपसिंग चव्हाण उपस्थित होते.