खामगाव : कृषि केंद्रावर चढ्या भावाने बियाणे व खत विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने कृषी विभागात दिली होती. या तक्रारीवरून कृषी विभागाने १२ जून रोजी येथील सरकी लाईन भागातील अंकूर कृषी
केंद्रावर धाड टाकली. याबाबत तपासणी करून कृषी केंद्राला नोटीस देण्यात आली आहे. रोहणा येथील शेतकरी धनंजय भारसाकळे हे अंकूर अग्रवाल यांच्या अंकूर कृषी केंद्रावर स्वदेशी-५ कापूस बियाणे घेण्याकरिता गेले असता त्यांना एका बॅगची किंमत ६८० रूपये असतांना तीची किंमत वाढवून १२०० रूपये एवढी सांगितली. याबाबत भारसाकळे यांनी कृषी विभागास चढ्या भावाने विक्री होत असल्याची तक्रार दिली.या तक्रारीवरून कृषी विभागाचे कृषी उपविभागीय अधिकारी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकाऱ्यांनी सापळा रचून शेतकरी भारसाकळे यांच्यासोबत बनावट ग्राहक अंकूर कृषी केंद्रामध्ये पाठविला. मात्र स्वदेशी-५ या कापूस बियाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने बनावट ग्राहकाला परत यावे लागले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी भारसाकळे यांना पाठविले. यावेळी कृषी केंद्र मालकाला याची भनक लागली असता त्यांनी योग्य त्या किंमतीत बाजार भावाने बियाणे दिले.
दरम्यान कृषी केंद्र उपविभागीय अधिकारी पटेल, तालुका कृषी अधिकारी गिरी, पंचायत कृषी अधिकारी गारडे यांच्यासह पथकाने दुकानावर धाड टाकून चौकशी सुरू केली. व बिलाची
तपासणी करून त्यांना नोटीस देण्यात आली अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गिरी यांनी दिली. सतत गेल्या पाच सहा वर्षां पासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, बी बियाणे, खतांच्या किमती वाढल्या आहेत अश्या परिस्थतीममद्ये केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत. असा दुगल कारभार अंकुर कृषी केंद्र येथे हा प्रकार उघडकीस आलाय. शेतकरयांना त्यांचे बी बियाणे एम आर पी दरात मिळायला हवे अशी विनंती जितेंद्र चोपडे (अखिल भारतीय किसान सभा जिल्हाध्यक्ष बुलडाणा) यांनी प्रशासनाला केली आहे.
खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली असून शेतकरी कृषी केंद्रावर बी-बियाणे, खते घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. तर दुसरीकडे कृषी केंद्रावर चढ्या भावाने विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी बाजारभावाप्रमाणेच खरेदी करावी. व त्या केंद्राकडून पक्के बील घ्यावे, तसेच चढ्या भावाने विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक होतअसेल तर शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.