कृउबास माजी संचालक राजेश हेलोडे यांच्या पुढाकाराने मिळाली मदत
खामगाव:- कृषी उत्पन्न बाजार समिती मधील श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने दोघांना उपचाराकरता आर्थिक मदत बाजार समिती मधील श्रमिक कामगार बांधवांना कामगार संघटनेच्या वतीने कन्सरग्रस्त महिला कामगार व अपघातग्रस्त कामगार बंधु या दोघांना ४० हजार रोख रक्कम आर्थिक मदत काल २५ मार्च २०२२ देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महिला कामगार श्रीमती अनिता बाई अंभोरे ह्या काही दिवसापासून कॅन्सर या आजाराने त्रस्त आहेत. तर कामगार शाहरुख हुसेन चौधरी यांचा अपघात झाल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज होती या दोघांना सर्व कामगार बांधव यांच्या सहकार्याने तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे यांच्या पुढाकारातून दोघांना ४० हजाररुपयाची आर्थिक मदत देण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील श्रमिक कामगार संघटनेचे दगडुजी सरदार , नथ्थुजी मोरे ,बब्बु पहेलवान,सर्जेराव फुके,पिंटु नितनवरे,प्रल्हाद जाधव,बबन घोडेचोर शे . अहमद ,शे.शागीर,सुनिल लांडगे , शे.शाहाबाज , शे.शब्बीर,शे.इस्माईल,राजु चौधरी,राहुल सावंग , अविनाश इंगळे,देवानंद हेलोडे,लखन हेलोडे, संजय मोरे,मिलिंद शेजोळे,पंकज सरदार,करण ससाने,पवन मोरे,महीला कामगार कमलाबाई हिवराळे,गंगुबाई दाभाडे,त्रिगुणाबाई वाकोडे यांचासह सर्व कामगार तथा महीला कामगार यांची उपस्थित होते .