बाजार समिती मधील व्यापारी वर्तुळात एकच खळबळ
खामगाव: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत व्यापारी राजेश ( मुन्नासेठ ) राधेशाम टावरी ( ४३ ) रा.तलाव रोड यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी समोर आली आहे.सजनपुरी शिवारातील भय्यूजी महाराज आश्रमाच्या पाठीमागे असलेल्या बीएसएनएल टॉवरजवळ आज दुपारी राजेश टावरी हे मूर्च्छित अवस्थेत पडलेले दिसून आले.यावेळी नागरिकांनी त्वरित त्यांना येथील सामान्य रुग्णालयात नेले.मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन टावरी यांना मृत घोषित केले . राजेश टावरी यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची शहरात चर्चा असून अधिक तपास खामगाव पोलिस करीत आहेत.टावरी यांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप स्पष्टता नसून या घटनेने व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मृतक राजेश टावरी यांची येथील कृउबासमध्ये गोपाल ट्रेडर्स नावाने अडत दुकान असून ते शहरात सुपरिचित व्यापारी आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,१ मुलगा,१ मुलगी,भाऊ,बहीण असा आप्त परिवार आहे . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी निर्भिड स्वराज्य परिवारातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना