April 19, 2025
मलकापूर

कुलूपबंद घराची टेहाळणी करून रात्रीच्यावेळी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

मलकापूर : मलकापूर येथे पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाचे अधिकारी-कर्मचारी हे टाऊन मध्ये रात्री गस्त घालत असतांना एएस आय रतनसिंह बोराडे व पो कॉ ईश्वर वाघ व योगेश जगताप यांना शहरातील आठवडी बाजारातील किराणा दुकाना समोर काही इसम संशयास्पद स्थितीत उभे दिसले म्हणून पोलीस त्यांच्याकडे गेले व पोलिसांची चाहूल लागल्याने ते इसम पळायला लागले असता पोलिसांना दुकानाचे शटर उघडे दिसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील एका इसमाने पोलिसांशी झटापटी सुध्दा केली पण पोलिसांनी एका इसमाला पकडले. त्या इसमाचे नाव राजिक शहा रफिक शहा २२ रा. मलकापूर असे आहे. सदरची माहिती एएस आय बोराडे यांनी मोबाईल फोन द्वारे पोस्टेला तसेच पोलिस निरीक्षक कैलास नागरे तसेच डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुठ्ठे यांना दिली. पोलीस निरीक्षक नागरे व इतर कर्मचाऱ्यांनी तपास चक्रे फिरवून रजिक शहा याच्या सोबत असलेले त्याचे साथीदार शेख साबीर शेख अहमद २७, शेख सलीम शेख रज्जाक १९, मो शाहरुख मो सिदिक २८, शेख मुस्ताक शेख शब्बीर २४, शेख तोसिफ शेख हुसेन २७, शेख हाफिज १९, शेख आमिन शेख खलीली २०, सै अरमान सै रहमान २३, शेख असिफ शेख रहेमान २२ सर्व राहणार मलकापूर यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली व वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून ३,७०,००० रू. चा मुद्देमाल जप्त करून मलकापूर शहर पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Related posts

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे शनिवारी बुलढाणा जिल्हयात…

nirbhid swarajya

आग विझवितांना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

nirbhid swarajya

सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन करा नाईक कृषी विद्यापीठाचे आवाहन..

nirbhid swarajya
error: Content is protected !!